Pune Bomb Blast : पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला दुसऱ्यांदा जामीन मंजूर

एमपीसी न्यूज : पुण्यातील (jangali maharaj road bomb blast) जंगली महाराज रोड येथे 2012 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामधील असलम शब्बीर शेख उर्फ ​​बंटी जहागीरदार या (Pune Bomb Blast) आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी त्याला प्रथम 2013 मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला 1 ऑक्टोबर 2015 रोजी पहिल्यांदा जामीन मंजूर झाला. परंतु, 2019 मध्ये त्याने जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे एटीएसच्या विनंतीवरुन त्याचा जामीन हायकोर्टाने रद्द केला. त्यानंतर जहागीरदारने साल 2020 मध्ये पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्याला आता जामीन मंजूर झाला आहे.

Maval News: केंद्र सरकारच्या विस्तारात शिंदे गटाला तीन मंत्रीपदे? श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुनीब इक्बाल मेमन, असद खान, इम्रान खान, सय्यद फिरोज, इरफान मुस्तफा लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी आणि असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार अशा आठ जणांना अटक केली आहे.

जंगली महाराज रोडवर 1 ऑगस्ट 2012 साली पाच साखळी (Pune Bomb Blast) बॉम्बस्फोट झाले. डेक्कन परिसरातील बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड कॅफे, देना बँक, गरवारे पूल अशा ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.