Pune : उड्डाणपूल पाडण्यापेक्षा मेट्रोच्या कामासाठी समांतर लाईन टाकावी – बाळासाहेब शिवरकर

Instead of demolishing flyovers, parallel lines should be laid for metro work - Balasaheb Shivarkar

एमपीसी न्यूज – पुणे विद्यापीठ आणि भोसलेनगर चौकातील दोन्ही उड्डाणपूल पाडण्यात येऊ नये. त्यापेक्षा हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी समांतर लाईन टाकावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या पुलाचा आराखडा नामवंत विदेशी तज्ज्ञांनी केला आहे. हा पूल स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि उपयुक्त असल्याचेही शिवरकर यांनी म्हटले आहे.

सध्या हा पूल पाडण्यासाठीचा खर्च अव्यवहार्य व अनावश्यक आहे. ‘पीएमआरडीऐ’तर्फे हा पूल पाडण्याला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली आहे.

मेट्रोच्या कामासाठी हे उड्डाणपूल अडचणीचे ठरत आहेत. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी पूल पाडण्यास विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने हे पूल पाडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी असल्याने हे दोन्ही उड्डाणपूल पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल बांधताना महापालिका कोणताही खर्च देणार नाही, नवीन टेंडर मंजूर होईपर्यंत पूल पडू नये आणि वाहतुकीचे नियोजन करावे, अशा उपसुचनेसह पूल पाडायला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तर्फे हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. हे दोन्ही पूल चुकल्याने रोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असते.

त्यामुळे हे उड्डाणपूल पडून नव्याने उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत.

उड्डाण पूल आणि मेट्रो यांचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात आला आहे. पीएमआरडीएकडून त्याचे काम करण्यात येणार आहे.

उड्डाणपूल पाडून दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २४० कोटी रुपये खर्च होणार आहे. 40 वर्षांपूर्वी हे पूल बांधण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.