Pune : सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटली; 10 ते 12 जण जखमी

एमपीसी न्यूज – सिंहगड घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी ( Pune)   जीप उलटून दहा ते बारा पर्यटक जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. जखमी पर्यटकांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे.

 सिंहगड घाट रस्त्यावरील वळणाजवळ बारा ते पंधरा पर्यटक घेऊन गडावरून खाली येत असलेली जीप उलटली. या अपघातात काही पर्यटकांना गंभीर, तर काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. इतर पर्यटक व वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले.
सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गडावर घेऊन आलेल्या जीपचाही गाडीतळाजवळील तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात एक मुलगी जखमी झाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. सुदैवाने ब्रेक निकामी झालेली जीप कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेमुळे सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक नियोजन व नियमनाचा प्रश्न ऐरणीवर ( Pune)  आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.