Talawade : तळवडे आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर

एमपीसी न्यूज – तळवडे आग दुर्घटनेतील (Talawade) आणखी एका महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळवडे आग दुर्घटनेत आतापर्यंत मृत्यूची संख्या 13 वर गेली आहे.

तर या दुर्घटनेत जखमी झालेला कारखान्याचा मालक शरद सुतार याला डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर देहूरोड पोलिसांनी त्याला अटक केली. शरद सुतार याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Pune : सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटली; 10 ते 12 जण जखमी

तळवडे रेड झोन मधील अनधिकृत शिवराज एन्टरप्रायझेस येथे ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँन्डल) तयार करणाऱ्या कारखान्यात काम सुरू असताना 8 डिसेंबर रोजी घडली होती. या घटनेत 6 महिलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.

तर 10 जण गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. आत्तापर्यात उपचार सुरु असलेल्या 10 पैकी सात महिलांचा मृत्यू झाला आहे.ज्यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर पोहचला (Talawade) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.