Pune : पुण्यात विनायक मेटे यांच्या निवासस्थानावरून वाद

एमपीसी न्यूज –  पुण्यात विनायक मेटे  यांच्या निवासस्थानावरून ( Pune)  वाद निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विनायक मेटे यांच्या बहिण व त्यांच्या मुलाने घर हडपल्याचा आराेप खूद्द विनायक मेटे यांच्या मुलाने केला आहे. केवळ आरोप करुन ते थांबले नाहीत तर या प्रकरणी त्यांनी पाेलीसांत धाव घेतली आहे. विनायक मेटे यांच्या मुलाच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी मेटेंच्या बहिणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा विमाननगर पोलीस स्टेशन येथे नाेंदविला  गेला आहे.

Talawade : तळवडे आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेटे यांच्या पत्नीच्या नावावर असलेली सदनिका मेटे यांच्या बहिणीने बळकावली आहे अशी तक्रार प्राप्त झाली. आशुतोष विनायक मेटे (वय 20, रा. कोरेगाव पार्क) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मेटे यांची बहिण सत्यशीला महादेव जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश (दोघे रा. पंचगंगा सोसायटी, ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव यांनी कुलूप तोडून सदनिकेचा बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद देण्यात आली आहे. मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांनी विमाननगर भागातील गंगापूरम सोसायटीत सदनिका खरेदी केली होती.

यांच्याकडून केला गेला आहे. या प्रकरणाचा विमाननगर पोलीस अधिक तपास करत ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.