Pune : पत्रकार पंकज खेळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज : पुण्यातील पत्रकार पंकज खेळकर यांचे 11 मार्च रोजी रात्री हृदयविकाराने (Pune) निधन झाले. आज तक आणि ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीमध्ये ते  पुण्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. ते 52 वर्षांचे होते. औंध येथील सिंध सोसायटीत त्यांचे वास्तव्य होते. हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

BJP : भाजपच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तृतीयपंथीय समाज आता मुख्य प्रवाहात आला – ऐश्वर्या पांडव

पंकज खेळकर हे मूळचे अकोला येथील होते. गेली 20-22 वर्ष ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. गेली 18 वर्ष ते आज तकमध्ये पुणे प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. इंडिया टूडे ग्रुपमध्ये असोसिएट एडिटर ही जबाबदारी सांभाळली आहे. ते पुणे ब्युरो म्हणून देखील जबाबदारी सांभाळत होते.

त्यांचा मुलगा शिक्षणासाठी विदेशात असून त्याला पुण्यात पोहोचायला रात्र होणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात अंत्यसंस्कार होणार नाहीत. तोपर्यंत त्यांचे पार्थिव ससून रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. अंत्यसंस्काराची वेळ आणि स्थळ निश्चित झाल्यानंतर कळवण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.