Pune : कलापिनी सांस्कृतिक केंद्रात कै. पद्माकर प्रधान स्मृती संगीत स्पर्धा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : कलापिनी आयोजित, मावळ तालुका स्तरीय, कै. पद्माकर प्रधान स्मृती संगीत स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. (Pune) स्पर्धेचे हे 47 वर्ष होते.

मावळ तालुका पातळीवर घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीतील 239 स्पर्धकांमधून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी रविवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी 2 सत्रांमध्ये पार पडली.

वाद्यवृंदाच्या साथीमध्ये स्पर्धकांनी अतिशय तयारीने गीते सादर केली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिद्ध चार्टर्ड अकांऊटटं स्वानंद आगाशे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

पात्रता फेरीचे परीक्षण विनायक लिमये, आशुतोष सुरजुसे, निशा (Pune) अभ्यंकर यांनी केले. अंतिम फेरीचे परीक्षण विष्णुपंत कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, हेमंत आठवले, अभिनेत्री गात यांनी केले.लोकाश्रयावर चालू असलेल्या मावळ तालुका पातळीवरील या स्पर्धेला सर्वांनी मदत करण्याचे आवाहन डॉ. अनंत परांजपे यांनी यावेळी केले.

सुगम संगीत स्पर्धेचे संयोजन आणि स्पर्धकांना मार्गदर्शन संपदा थिटे यांनी केले.

संवादिनी साथ – प्रदीप जोशी, श्रृती देशपांडे, संपदा थिटे यांनी केली. तबला साथ – अनिरूद्ध जोशी, चैतन्य लोवलेकर, मंगेश राजहंस यांनी व तालवाद्य साथ – प्रवीण ढवळे, योगीराज राजहंस. लीना परगी, शाम्भवी जाधव, अवधूत शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेसाठी अंजली सहस्त्रबुद्धे, लीना परगी, नितेश कुलकर्णी, रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे, प्राची गुप्ते, चांदणी पांडे, विजय कुलकर्णी, शार्दूल गद्रे, अभिलाष भवार तसेच कलापिनी महिला मंच सदस्यांनी सहकार्य केले.

PCMC : महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

कै.पद्माकर प्रधान स्मृती सुगम संगीत स्पर्धा 2023

शिशुगट – इ 1 ली – 2 री

प्रथम क्रमांक :- शुध्दी रावत, माउंट सेंट स्कूल

द्वितीय क्रमांक :- मृण्मयी पाटील, बालविकास विद्यालय

तृतीय क्रमांक:- रूचा कुलकर्णी, पैसा फंड प्राथमिक शाळा.

उत्तेजनार्थ :- सोहम किणीकर, बालविकास विद्यालय, प्रेम पांचाळ

प्रोत्साहनपर :- आराध्या शेट्टी, एम्प्रॉस स्कूल.

प्रणव खोत, बालविकास विद्यालय

इरा करपे, सरस्वती विद्या मंदिर

गार्गी कुंभार, बालविकास विद्यालय.

लहान गट – इयत्ता 3 री- 4 थी

प्रथम क्रमांक :- रेवा कशेळकर, बालविकास विद्यालय

द्वितीय क्रमांक :- अद्विका सावंत, एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल

तृतीय क्रमांक :- देव येवले, बालविकास विद्यालय

उत्तेजनार्थ :- शांभवी धर्माधिकारी, बाल विकास विद्यालय

स्वरा कुलकर्णी, बाल विकास विद्यालय

किशोर गट – इयत्ता 5 वी ते 7 वी

प्रथम क्रमांक – विवान रुपनवर, हचींग्ज स्कूल

द्वितीय क्रमांक – आर्या बांदल, लोणावळा

तृतीय क्रमांक- आवर्तन ढेंबे, बालविकास विद्यालय

उत्तेजनार्थ :- ऋग्वेद अरणके, सह्याद्री इंग्लिश स्कूल

शलाका काडगळ, रामभाऊ परुळेकर विद्यालय

पद्मनाभ फाकटकर, बालविकास विद्यालय

कुमारगट :- इयत्ता 8 वी ते 10 वी

प्रथम क्रमांक – श्रावणी कुलकर्णी, डी. वाय. पाटील

द्वितीय क्रमांक – तनिष्का वढावकर सरस्वती विद्यामंदिर

तृतीय क्रमांक – सान्वी चव्हाण, डी. वाय. पाटील

उत्तेजनार्थ :- विशाल चव्हाण, एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल

अथर्व ढोरे – प्रगती विद्यामंदिर

युवक गट

प्रथम क्रमांक :- धनश्री शिंदे

द्वितीय क्रमांक :- भक्ती काळे

उत्तेजनार्थ :-

संपदा गुरव ओखदे, सचिन पवार

प्रौढ गट :- Pune

प्रथम क्रमांक – प्राची पांडे

द्वितीय क्रमांक – मनीषा डावखर

तृतीय क्रमांक – संगीता कुवळेकर

उत्तेजनार्थ :- शिल्पा वनवे, नितेश कुलकर्णी

ज्येष्ठ गट :-

प्रथम क्रमांक – संजय साने

द्वितीय क्रमांक – अश्विनी परांजपे

उत्तेजनार्थ :- निशा अभ्यंकर, दीपक जयवंत

संगीतकार कै. दादा चांदेकर स्मृती – प्रतिभाशाली कलाकार – पुरस्कार – धनश्री शिंदे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.