Pimpri Chinchwad : ब्राह्मण महासंघाच्या वतीने गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहर(Pimpri Chinchwad) जिल्हा शाखेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ रविवारी काशीधाम मंगल कार्यालय चिंचवड येथे पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निखिल(Pimpri Chinchwad) लातूरकर होते. तसेच प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे होते. यावेळी माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, शैलजाताई मोरे व माजी नगरसेवक सुरेश भोईर, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, दिलीप कुलकर्णी, ब्रम्होद्योग उपाध्यक्ष, राजन बुडूख, पवन वैद्य, शंकर कुलकर्णी, दिलीप जोशी शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, महिला अध्यक्ष केतकी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

PCMC : महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

यावेळी शंकर जगताप यांनी सांगितले की, लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप फाउंडेशन च्या वतीने पाच विद्यार्थ्यांचा वार्षिक शिक्षणाचा खर्च करण्यात करण्यात येतो अशी माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना देव देश आणि धर्म यांची सेवा करण्याचे आवाहन केले.

निखिल लातूरकर यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल मध्ये जास्त वेळ न घालविता आपल्या ध्येयाकडे जास्त लक्ष द्यावे म्हणजे आपले भविष्य उज्वल होईल. तसेच त्यांनी बीजेपी चे अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ब्राह्मण महासंघाला पाच जागा देण्यात याव्या अशी विनंती केली. या कार्यक्रमास 450 पालक व बंधू, भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते

115 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आणि कै.अमिता कुलकर्णी, कै.श्रीहरी वाळवेकर व कै. शरयु जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ अनुक्रमे. उमेश कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी व नितीन जोशी यांनी प्रत्येकी 5000 प्रमाणे मुलांना शिष्यवृत्ती दिली. त्याचप्रमाणे गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक स्वाती पवार (वडमुख वाडी आळंदी), द्वितीय क्रमांक अनिता कुलकर्णी (रहाटणी पुणे) , तृतीय क्रमांक मंजुषा शिंदे (तानाजी नगर चिंचवड) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

परीक्षक म्हणून पी व्ही इव्हेंटच्या पूर्वा बारसावडे यांनी केले.

गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या कार्यक्रमाला विशेष मदत सुषमा वैद्य व संध्याताई कुलकर्णी यांनी केली.

सर्व उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष सचिन कुलकर्णी व कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री अतुल इनामदार यांनी केले. सूत्रसंचालन सौ पूजा कुलकर्णी यांनी केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आनंद देशमुख, संध्या कुलकर्णी, श्यामकांत कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, भाऊ कुलकर्णी, प्रवीण कुरबेट, पंकज कुलकर्णी, सुषमा वैद्य, कार्तिक गोवर्धन आणि महासंघाचे इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.