Pune : ‘LPG’ गॅसच्या ऐवजी चुलीवरच स्वयंपाक करू…

एमपीसी न्यूज : आजपासून देशभरात LPG गॅसचे दर वाढले (Pune) आहेत. या अगोदर घरगुती विना सबसिडी या LPG चे भाव 1056 रुपये असे होते. तर त्याच्यात अवघ्या 50 रुपयांची वाढ होऊन त्याची किंमत आता 1106 रुपये झाली आहे. तर या दरवाढीमुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे असे दिसून येते.

फक्त घरगुती LPG किंमत वाढली नसून, व्यावसायिक LPG सुद्धा किंमत वाढली आहे. व्यवसायिक एलपीजीची किंमत आधी 1775 रुपये होती. आता त्याची किंमत वाढवून 2128 रुपये झाली आहे. तर सामान्य माणसाला फक्त घरातलेच खाद्यपदार्थ नसून बाहेरच्या खाद्यपदार्थांची सुद्धा किंमत वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर वाढले असल्याने भारतात सुद्धा LPG गॅसचे दर वाढले आहेत. क्रूडच्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, वाढती महागाई आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे सुद्धा LPG गॅसच्या किंमती वाढल्या आहेत.

काही सामान्य जनतेशी संवाद साधल्यावर असे दिसून येते की त्यांना ही किमतीमध्ये वाढ काहीशी झेपत नाही. काही लोक तर परत चुलीवरती स्वयंपाक करायला सुद्धा सुरू करणार आहेत. पगारांमध्ये वाढ नाही पण महागाई वाढत चालली (Pune) आहे मग सामान्य माणसाने घर कसे चालवावे असा त्यांनी सरकार समोर प्रश्न उभा केला.

Pune Crime : एनडीएमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने 28 लाख रुपयांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.