Pune Crime : एनडीएमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने 28 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) कायमस्वरूपी नोकरी (Pune Crime) आणि इलेक्ट्रिक कामाचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची आणि त्याच्या नातेवाईकांची 28 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींचा शोध सुरू केला असून आणखी लोकांची अशीच फसवणूक झाली आहे का? याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणी प्रसाद गोविंद वझे (कोंढवे धावडे), परमेश्वर अंकुश शिंदे (सिंहगड रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची आरोपींची नावे आहेत. याबाबत विजय साखरे (वय 42) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

साखरे हे इलेक्ट्रिकल अभियंता असून ते टूर ऑपरेटर फर्म चालवतात. आरोपी शिंदे याने साखरे यांना फर्मच्या माध्यमातूनच संपर्क झाला. शिंदे यानेच साखरे यांची वझेसोबत ओळख करून दिली होती. आरोपी वझे याने (Pune Crime) एनडीएमध्ये बराच संपर्क आहे आणि तो कोणालाही एनडीएमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो असे सांगितले.

त्यामुळे साखरे याच्या पत्नीला आणि आणखी नातेवाईकांना नोकरी देण्याचे आश्वासन देत प्रति व्यक्ती 8 लाख रुपयांची मागणी केली. तसेच साखरे यांना एनडीएमध्ये इलेक्ट्रिक कामाचे कंत्राट देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी 3 लाख रुपये मागितले.

या आमिषाला भुलून साखरे यांनी वझेला काही प्रमाणात रोख आणि काही प्रमाणात ऑनलाइन पैसे दिले. पैसे दिल्यानंतर अनेक महिने आरोपींनी साखरे यांना ना नियुक्तीपत्र दिले, ना कोणतेही कंत्राट. तसेच कोणत्याही प्रकारचा संपर्क पुढे न झाल्याने साखरे यांनी पोलिसांत धाव घेतली. आता या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Pune : कलापिनी साहित्य मंचाच्या वतीने ‘मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.