Alandi : अखेर माऊली पार्कचे पथदिवे सुरू

एमपीसी न्यूज : आळंदी येथील मरकळ रस्त्याजवळील (Alandi) माऊली पार्क येथील पथदिवे बंद असल्याची बातमी एमपीसी न्यूजने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पथदिवे सुरू केले आहेत. त्याबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

अधिक माहिती अशी, की आळंदी येथील माऊली पार्कसह (Alandi) लगतच्या साई सागर हॉटेल जवळील एका गल्लीमध्ये पथदिवे रात्रीच्या वेळी बंद अवस्थेत होते.

माऊली पार्क येथील सर्व गल्ल्यामध्ये 3 ते 4 दिवस तेथील विद्युत खांबावरील पथदिवे बंद अवस्थेत असून रात्रीच्या वेळी त्या गल्ल्यामध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला असता.  त्यामुळे नागरिकांनी हे दिवे सुरू करण्याची मागणी केली होती.

Pune : कलापिनी साहित्य मंचाच्या वतीने ‘मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.