Today’s Horoscope 02 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 02 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – गुरूवार.

02-03-2023

शुभाशुभ विचार- सामान्य दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – आर्द्रा 12.43 पर्यंत नंतर पुनर्वसू 

चंद्र राशी – मिथुन.

—————————————–

आजचे राशिभविष्य

मेष  ( शुभ रंग- राखाडी )

ज्यात आपल्याला काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वासही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. आज काही अति हुशार मंडळी भेटणार आहेत, जरा कमीच बोललात तर बरे राहील.

वृषभ (शुभ रंग- भगवा )

आज कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवला तर अनेक किचकट कामे सोपी करता येतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस आनंदाने करतील.

मिथुन ( शुभ रंग- मरून )

आज तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत तुम्ही लक्ष घालाल प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

कर्क (शुभ रंग- नारंगी )

मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्यास शब्द देऊ नका. आज फक्त आपल्या स्वार्थाकडे लक्ष असू द्या. परमार्थ परवडणार नाही.

सिंह (शुभ रंग- डाळिंबी )

नोकरीच्या ठिकाणी आज काही मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठ मंडळी तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेतील. संततीकडून आज काही महत्त्वाचे समाचार येतील.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही आपल्या ओळखी वापरून इतरांची कामे कराल. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक असणार आहे. आज विरोधकांनाही तुमचे विचार पटवून देता येतील.

Pune : ‘LPG’ गॅसच्या ऐवजी चुलीवरच स्वयंपाक करू…

तूळ ( शुभ रंग- जांभळा )

नोकरी धंद्याच्या ठिकाणी काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. स्वतःवर संयम असू द्या. ज्येष्ठांना उपासनेची एखादी प्रचिती येईल.

वृश्चिक (शुभ रंग- हिरवा )

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल. आज कोणतेही धाडस टाळा.

धनु- (शुभ रंग- केशरी )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच करून मोकळे व्हा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असणे हिताचे. संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे गरजेचे आहे.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. नोकरीच्या ठिकाणी पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत जरा नरमच असेल. पती-पत्नी मधील मतभेद दुपारनंतर सौम्य होतील.

कुंभ (शुभ रंग – तांबडा )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ लाभेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

मीन -(शुभ रंग – पिस्ता )

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत विरोधक नमते घेतील. स्थावर विषयक अपुरे  व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत असावे. आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील.

 

 

 

 

   शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.