Chandrakant Patil: मंगळागौर खेळातही आरक्षण पाहिजे, मागणी करा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज: राज्य सरकारने दहीहंडी खेळाचा समावेश अधिकृत खेळात केला असून गोविंदांना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण देऊ केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. यावरून राज्यभरात मोठा गदारोळ उठला आहे.(Chandrakant Patil) तर अनेकांनी मंगळागौर विटी दांडू आणि इतर खेळाडूंनाही आरक्षण देणार का असा प्रश्न राज्य सरकारला विचारला होता. त्यावर आता राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मंगळागौर खेळातही आरक्षण पाहिजे असल्यास तशी मागणी करावी असे उत्तर त्यांनी यावर दिले. ते पुण्यात बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मंगळागौर खेळातही आरक्षण मिळावे असं ज्यांना वाटते त्यांनी तशी मागणी करावी.. ही मागणी योग्य असेल तर मंगळागौर खेळालाही आरक्षणामध्ये जोडण्यास काय अडचण आहे.. खेळ म्हणून त्याला मान्यता दिली तर पाच टक्के आरक्षणामध्ये हे देखील जोडता येईल.. विटी दांडू घ्या.. दुर्मिळ होत जाणाऱ्या भारतीय खेळाडूंचा देखील या पाच टक्के आरक्षण विचार करता येईल…

Chakan Crime: भांडणात मध्यस्थी करणाऱ्यालाच रॉडने मारहाण

गोविंदांना 5 टक्के आरक्षणावर स्पष्टीकरण

गोविंदांना देण्यात येणाऱ्या पाच टक्के आरक्षणावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वीच खेळाडूंसाठी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण आहे. खेळाडूंसाठी अस्तित्वात असलेल्या आरक्षणात दहीहंडीचा खेळ जोडला. या आरक्षणात यापूर्वीच अनेक खेळ जोडले गेलेले आहे.(Chandrakant Patil) त्यामध्ये हा एक खेळ जोडला गेला आहे. त्यामुळे दहीहंडी खेळाला नव्याने आरक्षण दिलं नाही. तर याला खेळाचा दर्जा देऊन ते आरक्षणात जोडले आहे. त्यामुळे दहीहंडी खेळायला नव्याने पाच टक्के आरक्षण दिलं नाही आणि ते देताही येत नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.