Pune Monsoon : पुणे-मुंबईसह कोकणाच्या बहुतांश भागात मान्सून दाखल

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने ज्याची सगळे जण वाट पहात होते तो नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला आहे. सध्या त्याने कोकणात आपला मुक्काम ठेवला असला तरी त्याने शनिवारी मुंबई, पुण्यासह कोकणाचा बहुतांश भाग व्यापला (Pune Monsoon) असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने शनिवारी दिली. 

 

शहरात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने (Pune Monsoon) लावलेल्या हजेरीत नागरिकांची दाणादाण उडाली होती तर ३० ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या होत्या. दरम्यान, शनिवारी सकाळी थोडा वेळ पाऊस झाला खरा मात्र त्यानंतर त्याने दिवसभर विश्रांती घेतली.त्यामुळे तापमानात उकाडा जाणवत होता.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार, नैऋत्य मोसमी पाऊस शनिवारी मुंबई पुण्यासह कोकणाचा बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापला आहे. मान्सूनची प्रगती उत्तरसीमा डहाणू,पुणे, गदग, बेंगळुरू, पुदुच्चेरी आणि सिलिगुडी येथून जात आहे.

किनारपट्टीलगत अरबी समुद्रावर सातत्याने ढगांची निर्मिती होत असल्याने पालघर, मुंबई, उपनगरे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या क्षेत्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची संततधारअपेक्षित आहे तर काही ठिकाणी मुसळधार सरी बरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Supriya Sule : अमिताभ बच्चन का पिक्चर भी, कभी कभी फ्लॉप होता है, राज्यसभा निकालानंतर सुप्रिया सुळे यांची डायलॉगबाजी

  • मॉन्सूनने शनिवारी मुंबई- पुण्यासह कोकणाचा बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला.
  • मॉन्सून प्रगतीची उत्तरसीमा डहाणू, पुणे, गदग, बेंगळुरू, पुदुच्चेरी आणि सिलिगुडी येथून जात आहे.
  • पुढील चार दिवस मॉन्सूनची आणखी प्रगती अपेक्षित आहे.
  • किनारपट्टीलगत अरबी समुद्रावर सातत्याने ढगांची निर्मिती होत असल्याने पालघर, मुंबई+उपनगरे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या क्षेत्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची संततधार अपेक्षित. काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता.
  • अरबी समुद्रावरून पश्चिम,नैऋत्येकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहाचा वाढलेला जोर, त्याला अनुसरून पश्चिम किनारपट्टीवर झालेली ढगांची दाटी, किनारपट्टीवर सातत्याने तयार होणारे उंच ढग – मॉन्सूनच्या आगमनाचे / सक्रियतेचे हे संकेत आहेत.
  • येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
  • येत्या 48 तासांत कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.