Pune :घराच्या साफसफाईत महापालिका ही करणार मदत, शनिवारपासून पुणे महापालिकेची टाकाऊ वस्तू संकलनाची विशेष मोहीम

एमपीसी न्यूज – दसरा,दिवाळीला आपण घराची साफसफाई (Pune)करायला घेतो. यावेळी घरातील अनेक टाकाऊ वस्तू बाहेर निघतात. त्या आपण तश्याच कचऱ्यात फेकुन देतो. मात्र तसे न करता त्यांचे योग्य ते वर्गणीकरण करा. त्या खराब वस्तू स्वतः महापालिका संकलीत करणार आहे. पुणे महापालिकेची ही मोहीम येत्या शनिवार (दि. 14) पासून सुरु करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात दोन आरोग्य कोठींवर वस्तू संकलन केंद्र सुरु केले जाणार आहेत,

शहरात कचरा न होता टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर व्हावा(Pune) या उद्देशाने महापालिका गेल्या वर्षीपासून ही मोहीम राबवत आहे ज्याला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक प्रभागातील किमान दोन आरोग्य कोठ्यांमध्ये सकाळी दहा ते चार या वेळेत या वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांना वस्तूंचे वर्गीकरण करायचे आहे.

Wagholi :वाघोली येथे फर्निचरच्या दुकानाला आग

ई कचरा व देवाचे फोटो, मुर्ती यासाठी स्वतंत्र मोहीम

यात ई कचरा व देवाचे फोटो, मुर्ती यासाठी स्वतंत्र मोहीम राबवली जात आहे. यामध्ये 5 नोव्हेंबर पासून इ-कचऱ्यासाठी तर २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी देवांचे फोटो व मुर्ती संकलीत केल्या जाणार आहेत. घरातील खराब झालेले किंवा तुटलेले, फुटलेले देवी देवतांचे फोटो, मुर्ती नदीपात्र, तलाव, झाडांच्या बुंध्यांशी ठेवले जात आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी महापालिकेने देवी देवतांसंबधित सर्व वस्तू व साहित्य गोळा करण्यासाठी 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम आयोजित केली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने निश्‍चित केलेल्या जागेवर सकाळी 10 ते दुपारी चार या वेळेत वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत.

ई कचरा संकलन –

मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, वॉशिंग मशिन यासह इतर खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळा करण्यासाठी 5 नोव्हेंबरपासून मोहीम सुरु केली जाणार आहे. यामध्ये महापालिका, जनवाणी, कमिन्स इंडिया, पूर्णम इकोव्हीजन, सागर मित्र, थंब क्रिएटिव्ह, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह यासह शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. 300 ठिकाणी ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलन अभियान राबविले जाईल. याची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.