Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या हाती मारण्याचा होता डाव – आमदार संजय गायकवाड

एमपीसी न्यूज – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली(Maharashtra) जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी आली होती.

त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती, या मागणीनुसार राज्य सरकारने एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्याबाबत तत्कालीन गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी बैठक सुरु होती, त्या वेळेला मातोश्री वरून फोन आला की, एकनाथ शिंदे यांना झेड सुरक्षा देण्यात येऊ नये.

Wagholi :वाघोली येथे फर्निचरच्या दुकानाला आग

याचा अर्थ त्यांना मारण्यासाठी नक्षलवाद्यांची मदत घेण्यात येणार होती. कारण ते इतर(Maharashtra)मार्गाने राजकारणातून संपणार नाहीत, त्यांना राजकारणातून संपविण्यासाठी हाच मार्ग आहे. असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.