Pune News: अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – राज्यात दरवर्षी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतरच सुरू केली जाते. मात्र शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहिर केले आहे. येत्या 1 ते 14 मे दरम्यान प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याचा सराव करता येणार असून,17 मेपासून प्रत्यक्ष अर्ज भरणे, अर्ज पडताळणीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुंबई, नाशिक या महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबविली जाते. या पाशर्वभूमीवर माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी अकरावीच्या आगामी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.दरवर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया निकालानंतर सुरू होते. मात्र यंदा 17 मेपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग 1 भरल्यानंतर निकालापर्यंत कागदपत्र पडताळणी होणार आहे. निकालानंतर प्रवेश अर्जाचा भाग 2 भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे,गुणवत्ता यादी जाहिर करणे, प्रवेश देणे आदी प्रक्रिया होईल.

प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या,एक विशेष फेरी होईल.शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी 23 मे ते दहावीचा निकाल जाहिर होईपर्यंत सुरू राहील.प्रवेश प्रक्रियेची माहिती https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.