Pune News : मासे पकडण्यासाठी खाणीच्या पाण्यात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खाणीचा कठड्यावरून पाण्यामध्ये पडल्यामुळे बुडून दुर्देवी मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातील उरवड गावाजवळील गाडेवाडी येथे एका खाजगी मालकीच्या खाणीतील पाण्यात हा प्रकार घडला. लहू मधु वाघमारे (वय 32) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लहू वाघमारे हा आपल्या भावासह मासे पकडण्यासाठी गेला होता. खाणीच्या कठड्यावर बसुन येतो मासे पकडत होता. यावेळी तो अचानक तो पाण्यात पडला. यावेळी दगडावर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असावा. त्यामुळे तो बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. पोहता येत असूनही पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खाणीतील पाण्यात या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो सापडला नाही. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन च्या टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर या टीमने दोन तास शोध मोहीम राबवून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.