Pune News : 30 वर्षांपुढील पुणेकरांना लसीकरणाला परवानगी द्या, खासदार गिरीश बापट यांची मोदींना पत्र

एमपीसी न्यूज – तीस वर्षाच्या पुढे वय असणाऱ्या पुणेकरांना सरसकट लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. पत्र लिहून खासदार गिरीश बापट यांनी ही मागणी केली.

_MPC_DIR_MPU_II

मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या पुण्यात वीस हजाराहून अधिक कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे पुण्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी मागील काही दिवसांपासून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तीस वर्षाच्या पुढे वय असणाऱ्यांना सरसकट लसीकरणासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

गिरीश बापट यांनी लिहिलेल्या पत्रात कोरोनामुळे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात मागील अनेक दिवसांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्याचा परिणाम लाखो मुलांच्या शिक्षणावर होत आहे. तसेच कोरोनामुळे घातलेल्या निर्बंधाचा फटका व्यावसायिकांनाही बसला असून त्याचा आर्थिक उलाढालीवर परिणाम होत आहे. ज्या वेगाने आता लसीकरण होत आहे ते पाहता वर्षभरानंतरही लसीकरण पूर्ण होणार नाही. त्यामुळे पुणे शहराला जास्तीत जास्त लसी पुरवून 30 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांसाठी सरसकट लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी बापट यांनी पत्रात द्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.