Pune News : म्हणून… भाजपकडून संजय काकडे यांची ‘या’ पदावर नियुक्ती

एमपीसीन्यूज : भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी खासदार संजय काकडे यांची आता प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचं पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काकडे यांना दिलं आहे.

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन माजी खासदार काकडे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं बोललं जात आहे. गतवेळी मनपा निवडणूकीत भाजपला मोठ यश मिळालं होतं. त्यामध्ये संजय काकडे यांचा मोठा वाटा होता. त्यांनी मनपामध्ये भाजपची सत्ता यावी यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते.

_MPC_DIR_MPU_II

राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी खासदार काकडे यांनी केलेले कार्य तसेच संसदेत काकडे यांचे कार्य उल्लेखनीय आणि अभिनंदनीय असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

काकडे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा तसेच जनसंपर्काचा उपयोग पक्ष संघटना वाढविण्यासाठी निश्चितपणे होईल, असं देखील भाजपानं म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.