Pune News : 55 बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन

एमपीसी न्यूज – हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केले जाते. तरच आत्म्यास मोक्ष प्राप्ती होते अशी धारणा आहे. विविध कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये अनेक मृतदेह बेवारस असतात. अशा बेवारस मृतदेहांचे अस्थी विसर्जन कोण करणार असा प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रीय कला अकादमीने पुढाकार 55 बेवारस अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. उपक्रमाचे हे 11 वे वर्ष आहे.

सर्वपित्री अमावास्येनिमित्त राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) आणि पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करण्यात आले. यावेळी मंदार रांजेकर, सदाशिव कुंदेन, अमर लांडे, डॉ. मिलिंद भोई, राजाभाऊ टिकार, आय. टी.शेख, नगरसेवक प्रदीप गायकवाड, राजेंद्र काकडे, बाला शुक्ला, किरण सावंत, विक्रम सरोदे,आरोग्य निरीक्षक, भाऊ जाधव मुकादम, पीयुष शाह, किरण सोनिवाल, चेतन शर्मा, सुरेश सकपाळ, विवेक टिळे, अक्षय खिंवसरा, ॲड.चित्रा जानुगडे, दिनेश मुळे, सुषमा खटावकर, मनीषा निंबाळकर, भाई ताम्हाणे, राजेश शिंदे, नितीन जाधव, राजेंद्र धायरकर उपस्थित होते.

सदाशिव कुंदेन म्हणाले, ‘राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावास्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जाते. बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून त्यांच्या आत्म्यास मोक्ष प्राप्ती यासाठी मंत्रोच्चार आणि अध्यायांचे पठण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.