Pune News : जी-20 परिषद होणार पुणे विद्यापीठात!

एमपीसी न्यूज : आंतरराष्ट्रीय स्तरावर (Pune News) अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी जी-20 देशांची परिषद आयोजित करण्याचा मान यंदा भारताला मिळाला असून, यातील काही बैठका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल सादर करताना ही माहिती दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बैठक 28 डिसेंबर (आज) रोजी झाली. सर्व नवनिर्वाचित सदस्य, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.

काळे म्हणाले की, जी-20 परिषदेच्या अनेक बैठका भारतभर होणार आहेत. काही बैठका या विद्यापीठात घेण्याचे नियोजन आहे. यासाठी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आठ लाख विद्यार्थ्यांसाठी जानेवारीमध्ये G20 या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून (Pune News) केंद्रीय समित्यांमधील मंडळींसोबत बैठका सुरू असल्याचेही डॉ. काळे यांनी सांगितले.

Pune Police : पुणे ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले एक वर्षासाठी स्थानबद्ध

विद्यापीठाच्या गेल्या सहा महिन्यांचा कार्य अहवाल सादर करताना ते म्हणाले की, या काळात विद्यापीठाने अमेरिकेतील अनेक प्रसिद्ध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांसोबत सामंजस्य करार केले. नवीन अभ्यासक्रम, परदेशी शिक्षणाच्या संधी, संशोधन यातून होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या आदिवासी जमाती आयोगाच्या कार्यक्रमात विद्यापीठाने सहभाग घेतला. याशिवाय गेल्या काही महिन्यात विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबविण्यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. डॉ.काळे यांनी विद्यापीठात सुरू असलेल्या संशोधन आणि अनेक उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी डॉ.संजीव सोनवणे यांनी लेखापरीक्षण अहवाल सादर करताना विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. उपस्थितांचे आभार डॉ.प्रफुल्ल पवार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.