Pune Police : पुणे ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले एक वर्षासाठी स्थानबद्ध

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) एका सराईत आरोपीस एका वर्षासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध केले. हरीश कानसकर (वय 47 वर्षे, रा. रांजणी, ता. आंबेगाव) असे आरोपीचे नावे आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारून एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत.

सविस्तर माहिती अशी, कि पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध शास्त्र बाळगणारे, अमली पदार्थांची विक्री करणारे, अवैध दारू विक्री करणारे, अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या आरोपींविरोधात पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे विशेष मोहीम राबवत असताना त्यांनी हि कारवाई केली. यावेळी मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावात वास्तव्यास असणारा हरीश हा लोकांना ब्लॅकमेल करणे, धमकी देऊन खंडणी वसूल करणे, अपंग व्यक्तीचे अपहरण करून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे, पोलीस असल्याची बतावणी करून जबरी चोरी करणे, अवैधरित्या विनापरवाना देशी, विदेशी दारूची विक्री करणे, अवैधरित्या विनापरवाना गुटखा, पानमसाला यासारख्या आरोग्याच्या दृष्टीने असुरक्षित असलेल्या उत्पादनाची बेकायदेशीर रित्या विक्री करणे अशा प्रकारच्या 12 गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे आढळून आले. तो सराईत गुन्हेगार असल्याचे (Pune Police) लक्षात येताच त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

Koregaon Park : प्रशासनाच्या संगणमताने पुन्हा हुक्का रेस्टॉरंटची उभारणी; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

त्याच्या या गुन्ह्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना देण्यात आली. त्याच्या गुन्ह्याची माहिती मिळताच त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. देशमुख यांच्या स्थानबद्धतेच्या आदेशान्वये हरीश कानसकर याला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, पोलीस हवालदार नलावडे, पोलीस नाईक सोमनाथ वासगावकर, पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश दळवी यांची वेगवेगळी पथके तयार करून त्याला 27 डिसेंबर रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.