Koregaon Park : प्रशासनाशी संगनमताने पुन्हा हुक्का रेस्टॉरंटची उभारणी; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज : कोरेगाव पार्क परिसरात घरे, बंगले पाडून (Koregaon Park) विविध हुक्का रेस्टॉरंट बांधले जात आहेत. त्यामुळे रहिवासी भागात अवैध पार्किंग वाढले आहे. हे सर्व पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पुणे पोलीस या दोघांच्या होकाराने सुरू आहे, असा आरोप काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी केला आहे.

Alandi : धर्मशाळेच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला

“काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्कमध्ये कारवाई करण्यात आली होती. मात्र, आठ दिवसांत सर्वकाही पूर्वपदावर आले. पुन्हा बांधकाम पूर्ण गतीने सुरू झाले असून रेस्टॉरंटही बांधण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही. प्रशासनाने दखल न घेतल्यास 31 डिसेंबरनंतर (Koregaon Park) रहिवासी ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.