Alandi : धर्मशाळेच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – आळंदी येथील कल्याण तालुका (Alandi) धर्मशाळेच्या पार्किंगमधून अज्ञातांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि.24) सकाळी उघडकीस आली.

पदमाकर विठ्ठलराव तुपेकर (वय 24, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : लहुजी वस्ताद यांच्याशिवाय क्रांतीचा इतिहास अपूर्ण – ॲड. सतीश गोरडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार (Alandi) रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 22/एएन 7629) शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता धर्मशाळेच्या पार्किंग मध्ये पार्क केली. पार्किंग मधून अज्ञाताने दुचाकी चोरून नेली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.