Koregaon Park: कोरेगाव पार्क येथे आढळला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह

एमपीसी न्यूज- कोरेगाव पार्क परिसरात पोलीस उपनिरीक्षक मृतावस्थेत (Koregaon Park)सापडल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक मृतावस्थेत सापडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मात्र हा अपघात आहे, घातपात आहे की आत्महत्या हे कळू शकलेले नाही.

दत्तात्रय कुरळे असे मृतावस्थेत सापडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव (Koregaon Park)आहे. कुरळे हे पुणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात (एमटी) नियुक्तीस होते. पोलीस दलात ते शिपाई म्हणून भरती झाले होते.

LokSabha Elections 2024 :  महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?

पदोन्नतीने ते उपनिरीक्षक झाले होते. शनिवारी सकाळी कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक सात परिसरात कुरळे मृतावस्थेत सापडले. सुरुवातीला पोलिसांना त्यांची ओळख पटली नाही. त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रावरुन ते पुणे पोलीस दलात उपनिरीक्षक असल्याचे उघडकीस आले.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुरळे यांच्या मृत्यू मागचे कारण समजू शकले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.