Pune: कौटुंबिक वादातून पतीनेच केला पत्नी व मुलीचा खून, पोलीस ठाण्यात पती स्वतःच झाला हजर

एमपीसी न्यूज – कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नी व मुलीचा खून केला व नंतर (Pune)पोलीस ठाण्यात स्वतःच हजर झाला. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील दत्तनगर परिसरात शुक्रवारी (दि.15)  रात्री घडली आहे.

अजय तळेवाले असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी श्वेता तळेवाले (वय 40) आणि (Pune)मयत मुलगी शिरोली तळेवाले (वय 16) या दोघींचा खून करण्यात आला आहे.

Bhosari :  महात्मा फुले नगरमध्ये मनसेच्या शाखेचे उद्घाटन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय तळेवाले याचे पत्नी श्वेता तळेवाले हिच्याशी काही महिन्यांपासून सतत पैशावरून वाद होत होते. तसाच वाद शुक्रवारी रात्री देखील पती-पत्नीमध्ये झाला. त्यामुळे आरोपी अजय याने पत्नी श्वेता झोपेत असताना तिच्या हाताची नस कापली आणि चाकूने वार केले.

 

तिथेच असलेली मुलगी शिरोली हिच्यावर देखील त्याने चाकूने वार केल्यावर दोघींचे उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपी अजय तळेवाले स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला असून अधिक तपास सुरु असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.