Pune: ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे 568 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, (Pune)सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यंदा  अ‍ॅक्युप्रेशर व अ‍ॅक्युपंक्चर यांसह दंतचिकित्सा, दातांची कवळी बसविणे (Pune)आणि रूट कॅनल व अन्य दंत उपचार सुविधा देखील रुग्णांना विनामूल्य देण्यात आली. पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 568 जणांची मोफत तपासणी करण्यात आली.

जय गणेश प्रांगण, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोर झालेल्या शिबीराच्या उद््घाटनप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरूण मंडळ अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, अंकुश रासने, ज्ञानेश्वर रासने, राजाभाऊ पायमोडे, राजाभाऊ घोडके यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री सदगुरू शंकर महाराज मठ धनकवडी पुणे वैद्यकीय समिती, भारती हॉस्पीटल दंत विभाग, रेणुका नेत्रालय पुणे, लायन्स क्लब ऑफ कात्रज, अष्टांग आयुर्वेद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर झाले. ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी आणि सहका-यांनी शिबीरांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.

LokSabha Elections 2024 : पुणे, मावळ, शिरुर, बारामतीत कोणत्या टप्प्यात, कधी होणार मतदान?

आरोग्य शिबीरात रक्त तपासणी, होमिओपॅथिक औषधोपचार, खुबा प्रत्यारोपण, किडनी स्टोन, प्रोटेस्ट ग्रंथी, नेत्र तपासणी, ह्रदयरोगावरील शस्त्रक्रिया, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, 50 टक्के सवलतीत एमआरआय, सीटीस्कॅन, जनरल औषधोपचार देखील देण्यात आला. दर महिन्यातून एकदा असे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. याकरिता ट्रस्टच्या गणपती भवन कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=AhYwtbONGh8&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.