Alandi : आळंदीमध्ये 31 डिसेंबर रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या उत्सवाला प्रारंभ

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठामध्ये (Alandi) सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या (शके 1944) वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबर पौष शु.नवमीला कोठी पूजनाने या उत्सवाला प्रारंभ होणार आहे.

तर, 7 जानेवारी पौष कृ. प्रतिपदेला उत्सवाची समाप्ती होणार आहे. या श्रींच्या वार्षिक उत्सवामध्ये 5 जानेवारी रोजी श्रींचा रथोत्सव संपन्न होणार असून 6 जानेवारी रोजी श्रींचा महोत्सवाचा व श्रींचे मुक्तद्वार (समाधी स्पर्श) दर्शनाचा भाविकांना लाभ घेता येणार आहे.

Koregaon Park : प्रशासनाच्या संगणमताने पुन्हा हुक्का रेस्टॉरंटची उभारणी; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या उत्सवानिमित्त मठामध्ये 31 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबर ते 6 जानेवारी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठामध्ये हभप वासुदेव महाराज बुरसे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे. 7 जानेवारी पालखी सोहळ्याच्या दिवशी हभप विष्णुपंत चक्रांकित बुवा यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे. भाविकांना 12 जानेवारीला श्रींच्या प्रक्षाळपूजेचा लाभ घेता (Alandi) येणार आहे. याबाबतची माहिती तेथील पुजारी, व्यवस्थापक, विश्वस्तांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.