Pune News : शहरातील 39 ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांना स्टॉल लावण्यास परवानगी 

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा गणेश मूर्ती विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला पदपथांवर स्टॉल उभारण्यास महापालिका प्रशासनाने मनाई केली आहे. पर्याय म्हणून शहराच्या विविध भागातील 39 ठिकाणी महापालिकेकडून भाडेतत्वावर तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर ठिकाणी स्टॉल उभारल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

शहरामध्ये दरवर्षी गणेशोत्सवामध्ये सहा लाख मूर्तींची विक्री होते. यामध्ये घरात बसविण्यात येणार्‍या मूर्तींच अधिक असतात. यंदा या मूर्ती विक्रेत्यांना पारंपरिक पद्धतीने यावर्षी रस्त्याच्या कडेला मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी महापालिकेच्या शाळांच्या आवारात स्टॉलसाठी भाडेतत्वावर जागा देण्याचा निर्णय यंदा ही पालिकेने घेतला आहे.  मात्र, याकडे पाठ फिरवत शहरभर अनधिकृत स्टोल उभारण्यात येत आहेत.  यावर महापालिकेने कारवाईचा करणार असल्याचे पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

रस्त्यावर स्टॉल लावण्यास परवानगी नाही

रस्त्यावर गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात आली नाही. गतवर्षी प्रमाणे शहरातील रिकाम्या जागांवर गणेश मूर्तींचे स्टॉल लावण्यास परवानगी दिली जाईल. अमेनिटी स्पेस, शाळेचे मैदान आणि इतर मोकळ्या जागा 39 ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीसाठी स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी दहा दिवसांसाठी पालिकेकडून दहा हजार रुपये शुल्क आकारले जातील, असे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.