Pune News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागाला पुरेसे मनुष्यबळ द्या

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील वेगाने विस्तारत असलेल्या औद्योगिक परिसराच्या पार्श्वभूमीवरपुणे विभागासाठी मोठे कार्यालय, अद्यावत प्रयोगशाळा आणि अधिकचे मनुष्यबळ त्वरित (Pune News) उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी संचालक मंडळाच्या 179 व्या बैठकीत केली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोर्डाची 179 वी बैठक दलामल हाऊस (नरीमन पॉइंट, मुंबई ) येथे बुधवारी (दि. 11 जानेवारी ) पार पडली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड ,सदस्य सचिव व पर्यावरण सचिव प्रवीण दराडे , बोर्डाचे राज्य सदस्य नितीन गोरे उपस्थित होते. गोरे यांनी बोर्डाच्या विविध विषयांवर आपले मत मांडले. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागासाठी मोठे कार्यालय,अद्यावत प्रयोगशाळा, अतिरिक्त मनुष्यबळ त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली.  याला अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून या बाबतचे प्रस्ताव मागितले आहेत. तसेच प्रायोगिक तत्त्वावर चाकण नगरपरिषदेसाठी (Pune News) एसटीपी प्लांट चा प्रस्ताव तयार करण्यात यावा व त्याला मंजुरी मिळावी अशीही मागणी केली.

Chakan News : चाकण मध्ये ईएसआयसीची विभागीय शाखा सुरु

चाकण औद्योगिक वसाहत व पुणे मधील सर्व अन्य औद्योगिक वसाहत यामध्ये औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी यांची संख्या अत्यंत कमी आहे. प्रदूषण विषयी नागरिकांचे प्रश्न तसेच औद्योगिक कंपन्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भव्य कार्यालय तत्काळ गरजेचे आहे. यामध्ये  पुण्यासाठी किमान 50 नवीन कर्मचारी आवश्यक आहेत. तसेच  कर्मचारी पेन्शन योजना लागू करणे, पदोन्नती व नवीन भरतीप्रक्रिया हे  महत्वाचे विषयही  नितीन गोरे यांनी निदर्शनास आणून दिले. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण मापक यंत्रणा व अद्ययावत डिजीटल बोर्ड बसवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. कंपन्यांना लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रमाणपत्र देताना धोकादायक सुचनांचे पालन होत आहे का ? याचे वेळोवेळी ऑडिट  तसेच पुणे व ठाणे जिल्ह्यात कंपन्यांमध्ये आगी लागल्या आहेत. त्याची चौकशी करण्याचे मागणी गोरे यांनी यावेळी केली. आळंदीमधील ( Pune News )इंद्रायणी नदीचे प्रदुषण कमी करण्यासाठी नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन योजनेचा महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ योजने मध्ये समावेश केल्याबद्दल त्यांनी महामंडळ व शासनाचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.