Pune News : अबब ! चार वर्षात पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी 11 कोटी 57 लाख रुपयांच्या पिशव्या वाटल्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील परिवर्तन संस्थेने पुणे महानगरपालिकेतील 162 नगरसेवकांचा मागील चार वर्षाच्या कामाचा लेखाजोखा घेत त्याचा अहवाल आज प्रसिद्ध केला. यामध्ये शहरातील नगरसेवकांनी तब्बल 11 कोटी 57 लाख 30 हजार 999 रुपये हे केवळ ज्यूट आणि कापडी पिशव्या वाटप करण्यावर खर्च करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

महापालिकेच्या 162 नगरसेवकांनी मागील चार वर्षाच्या काळात 90 कोटी 90 लाख 87 हजार 326 रुपये खर्च करण्यात आले.

यातील सर्वाधिक 15 कोटी 31 लाख 42 हजार रुपये (16.8℅) रक्कम ड्रेनेज/पावसाळी गटारे विषयक कामावर खर्च करण्यात आली.

ज्यूट/कापडी पिशव्या वाटपावर 11 कोटी 57 लाख 30 हजार खर्च

आपत्ती मदतकार्य/कोविड विषयक कार्यावर 6 कोटी 59 लाख 51 हजार खर्च

सफाई/राडारोडा उचलणे यावर 5 कोटी 71 लाख 54 हजार 799 इतकी रक्कम खर्च

पथदिवे-विद्युतविषयक कामावर 5 कोटी 52 लाख 31 हजार खर्च करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.