Pune News : गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी मंडईत राष्ट्रवादीच्या महिलांनी पेटवल्या चुली

एमपीसी न्यूज – सातत्याने होणाऱ्या गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज महात्मा फुले मंडईत केंद्र सरकार विरोधात चूल पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

गेल्या महिन्याभरात केंद्र सरकारने गॅस दरात 100 रुपयांनी वाढ केली आहे. 1 डिसेंबर ला पुण्यात गॅस चे दर 647 रु होते ते आज 697 रुपयांवर गेले आहेत. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधानांनी कोणत्याही जीवनावश्यक वास्तूमध्ये वाढ करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पंतप्रधानांनी पाळले नाही. उलट गॅसच्या दरात सातत्याने वाढ केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या दरवाढीमुळे महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे आम्ही या दरवाढीचा निषेध करतो. असे, मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.