Mumbai News : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस

केंद्र सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करुन ईडीसारख्या यंत्रणा मागे लावत असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत बातमी दिली आहे. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी ही नोटीस असल्याचे सांगितलं जातंय.

संजय राऊत हे वेळोवेळी भाजप विरोधात भूमिका घेत असतात. केंद्र सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करुन ईडी सारख्या यंत्रणा मागे लावत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

याआधी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली होती. तसेच शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मुलांना देखील ईडीने नोटीस पाठवली होती. वर्षा राऊत यांना नोटीस आल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आली नाहीय. विरोधकांवर नेहमी तुफान फटकेबाजी करणारे संजय राऊत काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.