Pune News : राज ठाकरेंनी सांगितला आपल्या पहिल्या भाषणाचा किस्सा, म्हणाले घरी जाऊन…

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवशाहीत करंडक स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमातील अभिजीत यांना राज ठाकरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.  यावेळी त्यांनी शिवतीर्थावर केलेल्या आयुष्यातील पहिला भाषणाचा रंजक किस्सा सांगितला. 

राज ठाकरे म्हणाले, 1992 साली शिवाजी पार्कवर एक जाहीर कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मी बाळासाहेबांच्या शेजारी व्यासपीठावर बसलो होतो. यावेळी इतरही अनेक नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते. तेव्हा अचानक बाळासाहेब मला म्हणाले, तू बोलणार आहेस ना, तेव्हा मी त्याला म्हणालो काहीतरी बोलू नकोस, नाहीतर मी येथून निघून जाईल. त्यावर बाळासाहेब म्हणाले नाही नाही आज तू बोललंच पाहिजे. आणि ते एकदम मला म्हणाले तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू. आणि तेव्हा मी माझ्या आयुष्यातलं पहिले भाषण केले. त्यानंतर घरी जाऊन सर्वांत आधी स्वतःचा लेहंगा चेक केला.

राज ठाकरे म्हणाले, माझ्या शालेय आयुष्यात मी कधीही जाहीर वकृत्व स्पर्धेत भाग घेतला नव्हता. लोकांसमोर माझ्या आयुष्यातले ते पहिलेच भाषण होते. तोपर्यंत मी कधी बोलू शकेल आणि भाषण करू शकेल यावर माझा स्वतःचाच विश्वास नव्हता. लहानपणापासून मी अनेक वक्ते ऐकले आहेत. बाळासाहेब ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी यासारख्या अनेक वक्त्यांना मी अगदी जवळून पाहिले आणि ऐकले सुद्धा. या भक्तांना जवळून जरी मी पहात असलो तरी मी देखील असे जाहीररित्या बोलेल असे कधीच वाटले नव्हते असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.