Pune News : विधान परिषदेचे यादीतून राजू शेट्टींचे नाव कापले? शरद पवारांनी स्पष्ट सांगितले की…

एमपीसी न्यूज – विधान परिषदेचे बारा आमदार नियुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला प्रस्ताव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे अजुनही प्रलंबित आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट देखील घेतली. परंतु, तरीही यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजू शेट्टी यांच्या नावाला आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच राजू शेट्टी यांनी देखील दिलेला शब्द पाळायचा की नाही हे राष्ट्रवादीने ठरवावे, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता खुद्द शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपालांना जी यादी दिली होती, त्यामध्ये राजू शेट्टी यांचे नाव आहे. राजू शेट्टी यांचे सहकार आणि शेती क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना विधानसभेत परिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिला आहे. परंतु, राज्यपालांकडूनच अद्याप यावर अंतिम निर्णय आलेला नाही. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे. राजू शेट्टींनी काय व्यक्तव्य केले त्यावर मी बोलणार नाही. परंतु, आम्ही दिलेला शब्द पाळला असून आता राज्यपालांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.