Pune News : श्रुती बापट यांनी एक हजाराहून अधिक मुलांना दिलं परकीय भाषेचं प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा भाषिक आणि सांस्कृतिक (Pune News) विविधतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो. पुण्यातील युवा भाषा शिक्षिका श्रुती बापट या गेल्या बारा वर्ष पुणे, कोपरगाव, प्रवरा, संगमनेर, राहाता, नगर अशा ठिकाणी जाऊन जर्मन आणि चिनी भाषा शिकवतात.

2013 पासून सातहून अधिक शाळांमधून जवळपास एक हजारहून अधिक मुलांना श्रुती यांनी परकीय भाषेचे प्रशिक्षण दिले असून अजूनही ते अविरत चालू आहे. परकीय भाषा शिकण्यासाठी आधी इंग्रजी भाषा अवगत असायला हवी हा निव्वळ गैरसमज असून तो फक्त ग्रामीण भागात नाही तर शहरातील लोकांच्या मनात पण असतो.

श्रुती सांगतात की, या संपूर्ण प्रवासात माझ्या गुरु डॉ. विनिता महाजनी यांची मोलाची साथ मला लाभली. जर्मन भाषेत पीएचडी केलेल्या डॉ. महाजनी यांनी समर्थ रामदास रचित मनाचे श्लोक जर्मन मधे भाषांतर केले आहेत. इतकं अमूल्य आणि तेवढेच अवघड पण सुंदर चाल लावून भाषांतर करुन सोपे करुन दिलेले मनाचे श्लोक जेव्हा जर्मन मुलं म्हणतात ते ऐकणं हा एक विलक्षण अनुभव असतो.

Pune News : संचालन तुटीमुळे पीएमपीची 5 रुपयांत 5 किलोमीटर प्रवास योजना बंद

भारतासाठीसुद्धा ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत (Pune News) हे पोहोचावं याचा प्रयत्न मी अविरत करीत राहणार. भाषा हे जरी संवाद साधण्याचे माध्यम असले तरी त्याचबरोबर तुम्ही त्या देशाशी, तेथील लोकांशी, संस्कृतीशी जोडले जाता. परकीय भाषा अवगत असणाऱ्यांना आपल्या देशात तसेच परदेशात कमविण्याची उत्तम संधी मिळू शकते तेव्हा बहुभाषिक होऊन आत्मनिर्भर बना असा संदेश श्रुती बापट तरुणाई ला देतात.

पुणे ब्रेमेन सॉलिडॅरिटी फोरम अंतर्गत मॅक्समुल्लर भवनच्या संचालिका मरिना ब्रून्स यांच्या हस्ते भारतातील शहर आणि ग्रामीण भागात जर्मन भाषेच्या प्रसार आणि प्रचाराच्या उल्लेखनीय कार्यासाठी श्रुती यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.