Pune News : संचालन तुटीमुळे पीएमपीची 5 रुपयांत 5 किलोमीटर प्रवास योजना बंद

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील (Pune News) पीएमपीच्या डेपोपासून पाच किलोमीटरच्या अंतरासाठी 5 रुपये तिकिट आकारणी बंद झाली असून, त्या मार्गांवर नेहमीप्रमाणे तिकिट आकारणी होणार आहे. त्यामुळे टप्प्यानुसार प्रवाशांकडून पाच ते दहा रुपये तिकिट आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा बदल 28 मार्गांवर होणार आहे.

पीएमपीने 25 ऑक्टोबर 2020 पासून पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकिट आकारणी सुरू केली होती. त्यासाठी 56 मार्ग निश्चित करण्यात आले होते. परंतु, काही मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे ते बंद करून 28 मार्गांवर ही सेवा सुरू ठेवण्यात आली होती. परंतु, बस वाहतुकीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता 5 किलोमीटर अंतरासाठी 5 रुपये तिकिट आकारणीमुळे पीएमपीने आर्थिक नुकसान होत होते. त्यातून संचलनातील तूटही वाढत होती. त्यामुळे या 28 मार्गांवर 19 फेब्रुवारीपासून नेहमीच्या दराने तिकिट आकारणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

Pune : पुण्यात पथनाट्याद्वारे व लोककलेतून एड्स विषयी जनजागृती 

या मार्गावर होणार नेहमीच्या दराने तिकीट आकारणी (डेपो आणि त्याअंतर्गत मार्ग)

स्वारगेट – पुणे स्टेशन- ताडीवाला रस्ता, पुलगेट ते शीतल पेट्रोल पंप

नरवीर तानाजी वाडी – डेक्कन – गोखलेनगर, डेक्कन- नीलज्योती – Pune News

कोथरूड – कोथरूड स्टँड ते कोथरूड स्टॅंड (वर्तुळाकृती मार्ग), गालिंदे पथ ते दांगट वस्ती, कर्वेनगर (गार्डन सिटी) ते कर्वेनगर (वर्तुळ)

कात्रज – जांभूळवाडी, नर्हेगाव, गुजरवाडी, येवलेवाडी, वाघजाईनगर

हडपसर – सासवड रोड रेल्वे स्टेशन, महंमदवाडी, फुरसुंगी, मांजरी, संकेत विहार, मांजरी बुद्रुक

अप्पर डेपो – मार्केटयार्ड- शत्रुंजय मंदिर (वर्तुळ), कात्रज- कोंढवा रोड- अप्पर डेपो

निगडी – निगडी- रूपीनगर, खंडोबा माळ ते चिखली

भोसरी – भोसरी- दिघी, चऱ्होली गाव- आळंदी

पिंपरी – चिंचवडगाव – वाल्हेकरवाडी

बालेवाडी – चिंचवडगाव – आकुर्डी रेल्वे स्टेशन

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.