Pune : पुण्यात पथनाट्याद्वारे व लोककलेतून एड्स विषयी जनजागृती

एमपीसी न्यूज – स्थलांतरित कामगार, आणि जनसमाजामध्ये (Pune) एचआयव्ही एड्स आणि क्षयरोग याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने मंगळवारी (दि. 21) भोसरी कामगार नाका येथे जिल्हा एड्स प्रतिबंध विभाग पुणे, यांचे मार्फत रसिक कला मंच पुणे यांनी जनजागृती पर पथनाट्य सादर केले.

न्यू भोसरी रुग्णालय भोसरी येथील एकात्मिक समुपदेशन विभागाच्या समुपदेशिका अर्चना शिंदे व रिलीफ फाउंडेशन स्थलांतरित लक्ष्य गट हस्तक्षेप प्रकल्प संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर कविता सुरवसे तसेच आरोग्य प्रशिक्षक किरण डोळस हर्षला गडदे यांनी कार्यक्रमाचे स्थानिक पातळीवर नियोजन केले .

पथनाट्यमार्फत जनतेला संयम बाळगा व एचआयव्ही एड्स टाळा असा संदेश देण्यात आला. एकमेकांशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याने, एचआयव्ही बाधित व्यक्तीचे रक्त निरोगी व्यक्तीस भरल्याने, दूषित सिरींज च्या वापराने आणि एचआयव्ही बाधित मातेकडून त्या मातेस होणाऱ्या बाळास हा आजार होण्याची शक्यता असते.

परंतु एचआयव्ही बाधित व्यक्ती सोबत फिरल्याने अथवा (Pune) वावरल्याने त्या व्यक्तीच्या वस्तू वापरल्याने डास चावल्याने त्या व्यक्तीसोबत एका घरामध्ये राहिल्याने हा आजार पसरत नाही. अशी माहिती साध्या सोप्या पथनाट्य लोककलेच्या माध्यमातून जनसामान्यांना प्रभावीपणे प्रसारित केली.

प्रत्येक सरकारी रुग्णालयांमध्ये एचआयव्ही एड्स ची तपासणी मार्गदर्शन व उपचार पद्धती ही मोफत उपलब्ध असून 1097 हा एचआयव्ही एड्स हेल्पलाइन नंबर आहे .तरी समाजातील गरजू लोकांनी पुढे येऊन या सुविधांचा फायदा घ्यावा व एचआयव्ही एड्स वर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय व अशासकीय यंत्रणेस सहकार्य करावे ही विनंती केली..

कार्यक्रमाचे समारोप रसिक कला मंचाच्या कलाकारांना पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले.

Mumbai News : मुंबईत कमला नगरमध्ये भीषण आग; 25 हून अधिक झोपड्या जळून खाक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.