Pune News: सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या रचनेत बदल करून वाहतूक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज: महामार्गावर अवजड वाहनांसह चारचाकी व दुचाकीस्वारांकडून लेनची शिस्त पाळली जात नाही. वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी स्पीडगन लावून कारवाई करणे आवश्‍यक आहे. तसेच सीसीटीव्हीही लावले पाहिजेत. यादृष्टीने वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी सूचना बैठकीत देण्यात आली. तसेच सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या रचनेत बदल करून वाहतूक क्षमता वाढविण्यावर चर्चा झल्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात नवले पूल येथे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या भागात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांचे जीव जात असल्याने यासंदर्भात महापालिकेच्या मुख्यसभेत चर्चा झाली. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी बैठक घेतली जाईल असे आश्‍वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले होते. त्यानुसार आज (शुक्रवारी) महापालिकेत ही बैठक घेतली.

उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृहनेते गणेश बीडकर, विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यासह एनएचएआयचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीत कात्रज बोगदा ते वडगाव, वारजे, चांदणी चौक, बावधन या भागातील महामार्गावरील वाहतुकीवर चर्चा करण्यात आली. बोगदा ते नवले पूल या दरम्यान सहा ठिकाणी वारंवार अपघात होतात. तसेच याच भागात अवजड वाहनांचा वेग जास्त असतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी रंबलर्स लावणे, सर्व्हिस रस्त्यांचे काम पूर्ण करून या परिसरातील दुचाकी महामार्गावर येणार नाहीत यासाठी काम करावे लागणार आहेत. महामार्गावरील पंक्चर बंद करून वाहने घुसण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.