Pune News : महिला युवतींसाठी उद्योजकता परिचय वेबीनार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन, आयुक्त कार्यालय पुणे  यांच्या सहकार्याने महिला, युवतींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ऑनलाईन उद्योजकता परिचय वेबीनार दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या महिला उद्योजकता धोरण आणि महिला उद्योजकता कक्ष या अंतर्गत उद्योजकता परिचय उपक्रम गूगल मीट द्वारे आयोजित केले आहे. महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण आणि महिला उद्योजकता धोरण या उद्देशाने या ऑनलाईन उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

इच्छुक महिला, युवतींनी आपले संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी, प्रस्तावित उद्योग याची माहिती [email protected] या ईमेलवर अथवा ईमेल आय डी नसल्यास व्हॉट्स अॅप क्रमांक 9403078752  / 9403131292 अथवा एसएमएस 7045172736 / 7400110580 या क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

माहिती प्राप्त झाल्यानंतर गूगल मीट लिंक तात्काळ पाठविण्यात येईल. सर्व इच्छुक महिला, युवती, उमेदवार आणि भावी यशस्वी महिला उद्योजक यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी भारती सोसे, राज्य समन्वयक महिला उद्योजकता विकास कक्ष, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद, येथे 9403683173 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.