Pune : शारदा सेंटर आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – शारदा स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित (Pune) केलेल्या यंदाच्या पहिल्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेस शनिवारी (दि 17) प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा शारदा सेंटरच्या टेबल टेनिस सभागृहात होणार आहे. त्यामध्ये साडेचारशे खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत आहे. ही स्पर्धा दिनांक 17 जून ते 25 जून 2023 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.

या स्पर्धेमध्ये राधिका सकपाळ, कौस्तुभ गिरगावकर, नैशा रेवसकर, आनंदीता लुनावत, नील मुळ्ये, श्रेयस माणकेश्वर, आदित्य जोरी, धनश्री पवार, स्वप्नाली नरळे, पृथ्वी बर्वे, संतोष वाखराडकर इत्यादी मानांकित खेळाडूंनी भाग घेतला आहे. या मोसमातील ही पहिलीच मानांकन स्पर्धा असल्यामुळे ती अतिशय रंगतदार होईल आणि प्रेक्षकांनाही चुरशीच्या लढती पहावयास मिळतील अशी अपेक्षा आहे.

यावेळी आश्लेषा बोडस, आशिष बोडस इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. ही स्पर्धा दिनांक 17 जून ते 25 जून या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी 90 हजार रुपयांची पारितोषिके (Pune) ठेवण्यात आली आहेत.‌ नऊ दिवस स्पर्धेतील सामने दररोज सकाळी दहा ते रात्री साडेआठ या वेळेत आयोजित केले जाणार आहेत.

Chinchwad : साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न सोडविणार – मुख्यमंत्री

या स्पर्धेसाठी पुरुष व महिला एकेरी, पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी, 40 वर्षावरील ज्येष्ठ खेळाडू, 11,13,15,17,19 वर्षाखालील मुले व मुली असे गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धा संयोजन समितीच्या अध्यक्षा स्मिता बोडस व संघटन सहसचिव श्रीराम कोनकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.