Pune News – ‘उत्तर भारतीय भवनसाठी उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Pune News) उत्तर भारतीयांची संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उपक्रमांसाठी ‘ उत्तर भारतीय भवन ‘ उभारावे , असे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व पुणे, पिंपरी -चिंचवड, सांगली जिल्हयाचे प्रभारी नवीन सिंह यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना दिले. आज,१६ जून रोजी सकाळी पुण्यात मौर्य यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांनी हे निवेदन दिले.
उत्तर भारतीयांच्या औद्योगिक, सामाजिक , सांस्कृतिक प्रगतीसाठी ही वास्तू उपयुक्त ठरेल, त्यामुळे तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी विनंती नवीन सिंह यांनी केली. पुण्यातून उत्तर प्रदेशात जाण्यासाठी असणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या आणि वेळा याविषयी देखील चर्चा करण्यात आली.

विवाहांच्या, सुट्ट्यांच्या हंगामात रेल्वे गाड्या कमी पडत असून वंदे भारत, दुरांतो सारख्या जलद गाड्यांची आवश्यकता असल्याचे नवीन सिंह यांनी सांगितले. यावेळी नवीन सिंह यांनी श्री.मौर्य यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. उत्तर भारतीय मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.