Pune : 7 जानेवारी रोजी ‘ संगीतसुधा’ कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत (Pune) ‘संगीतसुधा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दीपश्री फाटक – शेठजी (अमेरिका) हे सादर करणार आहेत.

शास्त्रीय, उप शास्त्रीय, आणि सुगम संगीत त्या सादर करणार आहेत. त्यांना पुष्कर महाजन (तबला), लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम)हे साथसंगत करणार आहेत.

Pimpri – लायन्स क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

हा कार्यक्रम  7 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 199 वा कार्यक्रम आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.