Pune Police : तोतया पत्रकारांना खंडणी घेताना रंगेहात अटक; पोलिसांकडून गोळीबार

एमपीसी न्यूज :  पुण्यातील एका व्यवसायिकाला ब्लॅकमेल करत (Pune Police) पाच कोटींच्या खंडणीची मागणी करून पन्नास लाखांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या दोघा खंडणीखोरांना पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्याच्या परिसरात पाठलाग करून पकडले. या दरम्यान पोलिसांना गोळीबारही करावा लागला आहे. 

दरम्यान, व्यवसायिकासोबत पोलिस असल्याची चाहूल लागताच दोघांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी पिस्तूलातून दोन राऊंड गाडीच्या पाठीमागील चाकावर फायर केले.

Maharashtra : ‘आप’ची राज्य समिती बरखास्त, नव्याने संघटन बांधणी होणार!

त्यानंतर मदतीसाठी आलेले पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या पथकाने स्थानिकांच्या (Pune Police) मदतीने दोघा खंडणीखोरांना पकडले. दोघेही खंडणीखोर तोतया पत्रकार असल्याचे समोर आले आहे.  गाडी अंगावर घातल्याने एका पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.