Pune Police : पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण

एमपीसी न्यूज : फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करणार (Pune Police) असल्याचे सांगणाऱ्या तरुणास पोलिसांनी सतर्कतेने अवघ्या एका तासात शोधून काढत त्याचे प्राण वाचवले. हि घटना शनिवार (दि.17) घडली आहे.

स्मार्थना पाटील (पोलीस उप आयुक्त 2, पुणे) यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिसांनी केली आहे. ही घटना सालीसबरी पार्क येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, “माझ्या परिचयाच्या असलेल्या व्यक्तीने काल संध्याकाळी साडे पाच – सहा वाजता माहिती दिली. ते म्हणाले की, त्यांच्या ओळखीचा तरुण  फेसबुक लाईव्हमध्ये आत्महत्या करणार असल्याचे सांगत आहे. त्यांनी त्या तरुणाचा पत्ता व फोन नंबर पण आम्हाला दिला. त्या तरुणाचा फोन लोकेशन आम्ही ट्रेस करत असताना समजले की तो स्वारगेट व लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. लगेच त्या तरुणाला शोधण्यासाठी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या 2 व लष्कर पोलीस ठाण्याची एक टिम तयार करण्यात आल्या. तांत्रिक विश्लेषण टिमने त्या तरुणाचे पहिले (Pune Police) व दुसरे लोकेशन दिले. त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला.

Pune : तर ‘पठाण’विरोधात आम्हीही आंदोलन करू – रामदास आठवले

तेव्हा आम्ही आमच्या टीम्स त्याचा घराच्या आसपास त्याला शोधायला पाठवल्या. आम्ही या टीमला त्याचा फेसबुकवरील फोटो पाठवला होता, पण हा फोटो जुना होता, असे नंतर समजले. ही टीम त्याच्या घराच्या आजूबाजूला शोध घेत असताना एकजण रडत बसलेला दिसला. टिमचे मेम्बर्स तेथे गेले व त्यांना फोटोतील व्यक्ती असावी असा संशय आला, चौकशी केली असता तो तोच तरुण असल्याचे समोर आले.
त्याची चौकशी केली. त्या व्यक्तीला स्वारगेट पोलीस ठाण्यात नेवून त्यांचे समुपदेशन केले. त्याच्यामध्ये जगण्याची इच्छा जागृत केली. त्यानंतर त्यांच्या मित्राकडे त्यांना सोपवण्यात आले.”

पोलिसांच्या सतर्कतेमुळे ऑफिसचा स्टाफ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण व स्वारगेट व लष्कर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीम्सच्या प्रयत्नांमुळे काल त्या तरुणाचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश आले आहे, असे ही त्यांनी आवर्जून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.