Pune : सहाव्या सिटी प्रीमियर लीग (सीपीएल) आंतर क्लब 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेेत प्रबल पँथर्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश 

13,15,17 वर्षाखालील गटात प्रबल पँथर्स संघाची सुरेख कामगिरी 

एमपीसी न्यूज – सहाव्या सिटी प्रीमियर लीग (सीपीएल)2024 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेेत (Pune)साखळी फेरीत प्रबल पँथर्स संघाने 13,15 व 17 वर्षाखालील गटात सुरेख कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 
स्पोर्टस फाऊंडेशन पुणे यांच्या मालकीच्या सिटी एफसी पुणे यांच्या वतीने या (Pune)स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 15 वर्षाखालील गटात आरव वानखडे 12, 19मि.) याने केलेल्या दोन गोलाच्या जोरावर प्रबल पँथर्स संघाने सक्सेस स्ट्रायकर्सचा 2-1 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात प्रबल पँथर्स संघाने क्रॉसफ्लेक्स किंग्स संघावर 3-0 असा विजय मिळवला. प्रबल पँथर्स संघाकडून आरव वानखडे(10मि.)ओंकार गायकवाड(15मि.)यांनी प्रत्येकी एक गोल केला.
17वर्षाखालील गटात प्रबल पँथर्स संघाने तीन सामन्यात 2बरोबरी व 1विजयासह आपली अपराजित राहण्याची मालिका कायम राखली. पहिल्या सामन्यात प्रबल पँथर्स संघाने सक्सेस स्ट्रायकर्स संघाला 2-2 असे तर, दुसऱ्या सामन्यात प्रबल पँथर्स संघाने आदित्य ऑलस्टार्स संघाला 3-3 असे बरोबरी रोखले.
निकाल: 15वर्षाखालील गट:
डीसी ड्रॅगन्स: 1 (श्री जयगुडे 9) बरोबरी वि.प्रबल पँथर्स:1 (वैष्णव वाडेकर 14);
सक्सेस स्ट्रायकर्स: 1 (पार्थ भारद्वाज 12) वि.वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 0;

डीसी ड्रॅगन्स: 3 (आर्यन शेडगे 19, आदित्य शेषलू 22, अर्णव मिश्रा 24(स्वयं गोल) वि.वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 0
सक्सेस स्ट्रायकर्स: 1 (स्वरित जिवतोडे 15) पराभुत वि.प्रबल पँथर्स: 2(आरव वानखडे 12, 19);
डीसी ड्रॅगन्स: 4 (आर्यन शेडगे 15, 19, 20, समर्थ तावरे 17) वि.वि.सक्सेस स्ट्रायकर्स: 3 (पार्थ भारद्वाज 12, स्वरित जीवतोडे 18, मोनीश आमोडे 22)
प्रबल पँथर्स: 3 (आरव वानखडे 10, ओंकार गायकवाड 15, आयुष देशमुख 20स्वयंगोल) वि.वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 0
 
17 वर्षाखालील गट:
कॉन्स्टिलेशन चिताज: 0 बरोबरी वि.आदित्य ऑलस्टार्स: 0
सक्सेस स्ट्रायकर्स: 2 (स्वप्नील महामुनी 5, अमित निपाणे 17) बरोबरी वि.प्रबल पँथर्स: 2 (प्रथमेश सावदे 10, 22);
कॉन्स्टिलेशन चिताज: 1 (शिवम पाटील 12) पराभुत वि.प्रबल पँथर्स: 2 (रोहित रावत 17, प्रथमेश सावदे 22);
सक्सेस स्ट्रायकर्स: 3 (सोहम चौधरी I9, अमित निपानी 12, पृथ्वीराज माने 20) वि.वि.आदित्य ऑलस्टार्स: 0
कॉन्स्टिलेशन चिताज: 3 (शोल मोरे 5, 15, 19) बरोबरी वि. सक्सेस स्ट्रायकर्स: 3 (रोहन मुरकुटे 12, 13, पृथ्वीराज माने 25)
आदित्य ऑलस्टार्स: 3 (देव बडगुजर 9, ललित पाटील 12, माधव अभय 20) बरोबरी वि.प्रबल पँथर्स: 3 (प्रथमेश सावदे 14, अथर्व रेवळकर 18, 24)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.