Pimpri : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने स्त्रियांना ज्ञानमंदिराचे दार खुले – डॉ.अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले (Pimpri)यांच्या त्यागाचे,संघर्षाचे फलित म्हणून आज देशातील कोट्यवधी स्त्रियांना ज्ञानमंदिराचेद्वार खुले असल्याचे शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने (दि.25) भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी,नागरिकांसाठी विशाल सिनेमा पिंपरी येथे “सत्यशोधक”या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले.

Alandi : सराईत गुन्हेगारांकडून 3 गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतुसे जप्त

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले”स्त्रियांच्या जीवनात(Pimpri) शिक्षणाची मशाल पेटवण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतिराव फुले यांनी असंख्य चटके सोसले. त्यांच्या त्यागाचे, संघर्षाचे फलित म्हणून आज देशातील कोट्यवधी स्त्रियांना ज्ञानमंदिराचे द्वार खुले आहे. फुले दांपत्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सर्व जाती-धर्माच्या साथीदारांना घेऊन आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जो संघर्ष केला.त्यांचे उपकार बहुजन समाज कधीच विसरणार नाही.

फुले दाम्पत्याच्या संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या “सत्यशोधक” चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन केल्याबद्दल युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे अभिनंदन केले.बहुजन समाज एकसंघ व्हावा यासाठी विविध उपक्रमातून शेख व त्यांचे युवक पदाधिकारी यांचा सातत्याने पुढाकार असतो,विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “शिव-शाहू-फुले-आंबेडकर” पुरोगामी विचार घराघरात नेण्यासाठी ते विविध उपक्रमांतून कार्यरत असतात.हे समाजकार्य युवकांनी यापुढेही अखंड सुरू ठेवावे अशा शुभेच्छा डॉ.कोल्हे यांनी युवक पदाधिकाऱ्यांना दिल्या.

युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “सध्याच्या काळात सत्ताधारी कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला जात,पंथ,धर्म अशा गोष्टीच्या गाळात अडकवत आहेत.बहुजन समाजावर कळत नकळतपणे जी भेदभावाची झापड निर्माण झाली आहे ते पुसण्याचे काम “सत्यशोधक” चित्रपट करतो.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या विचारांना समजून घ्यायचेअसेल तर सत्यशोधक चित्रपट अवश्य बघावा.महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आपल्याला प्रेरणा देतो,अस्वस्थ करतो आणि स्वतःच्या पलीकडे बघायला भाग पाडतो.म्हणून बहुजन युवक,युवती,महिला यांच्या प्रबोधनासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही हा चित्रपट नागरिकांना मोफत दाखवला.”

यावेळी चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर,राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर,युवक शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर, विद्यार्थीअध्यक्ष राहुल आहेर, माजी उपमहापौर विश्रांती पाडळे,भोसरी विधानसभाअध्यक्ष संतोष शिंदे,प्रदेश संघटक राहुल पवार,सरचिटणीस मेघराज लोखंडे,शहरसचिव रजनीकांत गायकवाड,संघटक ऋषिकेश गाडे,अमोल माळी,रेखा मोरे स्वप्नाली असोले,संतोष माळी,राजश्री भालेराव,फहिम शेख,शोभा साठे,विकास कांबळे,मयूर खरात,अशोक कोळी आधी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.