Pune : पुणे शहर विभागाच्या आंतर महाविद्यालयीन मल्लखांब स्पर्धा संपन्न

एमपीसी न्यूज – पुणे शहर विभागाच्या आंतर महाविद्यालयीन ( Pune ) मल्लखांब स्पर्धा मराठवाडा मित्र मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कर्वेनगर येथे संपन्न झाल्या.    1  नोव्हेंबर 2023 रोजी पासून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्धघाटन मराठवाडा मित्र मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय गोहोकर आणि मल्लखांब या खेळातील छत्रपती पुरस्कार विजेते व पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष  सत्यजीत शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

Talegaon Dabhade : क्रांतिरत्न विष्णू पिंगळे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

आंतर महाविद्यालयीन मल्लखांब मुले व मुली स्पर्धेचा अंतिम निकाल

मल्लखांब मुले

  क्रमांक          खेळाडूचे नाव     गुण      महाविद्यालय

प्रथम क्रमांक   वेदान्त शिंदे       25            फर्ग्यूसन महाविद्यालय

द्वितीय क्रमांक  वैभव गाढवे       24.80     फर्ग्यूसन महाविद्यालय

तृतीय क्रमांक    शुभंकर खवले   24.60     म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स

मल्लखांब मुली

क्रमांक          खेळाडूचे नाव     गुण      महाविद्यालय

प्रथम क्रमांक  पल्लवी शिंदेश्री     16.65    श्री  शाहू मंदिर महाविद्यालय

द्वितीय क्रमांक  नेहा क्षीरसागर   16.60    श्री शाहू मंदिर महाविद्यालय

तृतीय क्रमांक   मीताली प्रधान     15.00  आबासाहेब गरवारे महाविद्यालय

 

या प्रसंगी डॉ. सुदाम शेळके, डॉ. उमेश बिबवे, आंतर महाविद्यालयीन सचिव प्रा. अनिरुद्ध शर्मा, श्री. कृष्णा काळे, सोनाली भरेकर, नेहा जोशी, सुजय गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार डॉ. तुषार गुजर (आयोजन सचिव) यांनी ( Pune ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.