Talegaon Dabhade : क्रांतिरत्न विष्णू पिंगळे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – इंग्रज सत्तेला विरोध करत लढा देणारे क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे ( Talegaon Dabhade) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होते. विद्यालयात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नविन समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी क्रांतरित्न विष्णू गणेश पिंगळे यांचे 108 पुण्यतिथी निमित्ताने संस्थेच्या विविध शाळामध्ये अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांचे मार्गदर्शनाखाली नविन समर्थ विद्यालयाच्या प्राचार्या वासंती काळोखे,अ‍ॅड पु वा परांजपे विद्या मंदिराचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे,  एकविरा विद्या मंदिराचे प्राचार्य संजय वंजारे तसेच संस्थेच्या इतर शाळांमध्येही क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे यांच्या प्रतिमचे पूजन व अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा पिंगळे यांनी इंग्रज सत्तेविरूद्ध लढा दिल्याने त्यांना 16नोव्हेंबर1915 रोजी फाशी दिली ( Talegaon Dabhade) होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.